Ad will apear here
Next
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाशिक रोड रेल्वेस्थानकाची पाहणी
नाशिक रोड रेल्वेस्थानकाची पाहणी करताना मध्य रेल्वेचे मुंबई येथील ‘एजीएम’ डॉ. आर. बद्रीनारायण, आर. के. कुठार, अजयकुमार, आर. के. शर्मा, कुंदन महापात्रा, एस. जी. सैय्यद, गणेश पाटील, एम. बी. डोके, जुबेर पठाण, संजय गांगुर्डे आदी.

नाशिक : सध्या देशात असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या दर्जात्मक आणि गुणात्मक सेवा याची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) डॉ. आर. बद्रीनारायण यांनी चार मार्च २०१९ रोजी नाशिक रोड रेल्वेस्थानकाला भेट दिली. स्थानकातील प्रवासी सुरक्षा व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. अधिकाऱ्यांना विविधस्तरावर सूचना देऊन प्रवाशांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले.

या प्रसंगी स्टेशनमास्तर आर. के. कुठार, भुसावळचे वरिष्ठ तिकीट अधिकारी अजयकुमार, वरिष्ठ ‘डीसीएम’ आर. के. शर्मा, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, अभियंता एस. जी. सैय्यद, गणेश पाटील, एम. बी. डोके, ‘आरपीएफ’चे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, संजय गांगुर्डे आदी उपस्थित होते.



प्लॅटफॉर्म क्रमांक दोन, तीन आणि चारवरील सर्व सोयी-सुविधांची पाहणी करण्यात आली. यामध्ये रेल्वेस्थानकातील बुकिंग व रिझर्व्हेशन ऑफिस, सरकते जिने, रेल्वे सुरक्षा कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आदींची पाहणी करून काही सूचना त्यांनी केल्या. स्थानकातील स्वच्छतेबाबत पाहणी करतानाच कंत्राटी सफाई कामगारांशी संवाद साधून त्यांना योग्य ते मानधन मिळते की नाही याची माहिती घेतली. या कामगारांना कागदोपत्री जेवढा पगार दाखवला जातो, त्यापेक्षा कमी पगार त्यांच्या हातात मिळतो असे पत्रकारांनी निर्देशनास आणून दिले असता कामगारांनीच याबाबत जागरूक राहावे, असे सांगतानाच ‘रेल दृष्टी’ या संकेतस्थळावर कंत्राटाची सर्व माहिती उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक रोड आणि देवळाली ही स्थानके महत्त्वाची मानली जात असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासंबंधीही काही उपाययोजना करणार असल्याचे ते या वेळी म्हणाले.



सध्या भारतातील काही ठिकाणे हाय अलर्टवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड, देवळाली या लष्कराशी संबंधित रेल्वेस्थानकातही हाय अलर्ट जारी केला आहे. लष्करी जवानांच्या वाहतुकीसाठी दोन्ही रेल्वेस्थानके सज्ज असून, इतर रेल्वेस्थानकांनाही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. देवळाली कॅम्पहून जवानांच्या रेल्वेगाड्या रवाना होत असल्यामुळे ते स्टेशनही सतर्क आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून दररोज सुमारे वीस हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे येथे कडेकोड सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXOBY
Similar Posts
पुणे-नाशिक प्रवास आता केवळ दीड तासांचा नाशिक : रेल्वे खात्याने प्रवाशांना गुणवत्तापूर्ण प्रवास करायला मिळावा यासाठी निरनिराळ्या योजना आखल्या असून, पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्ग हा त्याचाच एक भाग आहे. या लोहमार्गाचे काम फेब्रुवारी २०१९पासून सुरू होणार आहे. २३१ किलोमीटरच्या हायस्पीड लोहमार्गाचे काम झाल्यानंतर पुण्याहून नाशिकला येण्यासाठी केवळ दीड तासाचा अवधी लागणार आहे
दसरा-दिवाळी-नाताळसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या नाशिक : दसरा-दिवाळी-नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांसाठी विविध मार्गांवर अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. एक ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होत आहेत.
अनाथ, दृष्टिहीन दाम्पत्याच्या विवाहाला आसरा फाउंडेशनचा मदतीचा हात नाशिक : मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. मुलगा किंवा मुलगी शारीरिक विकलांग असेल, तर अडचणींमध्ये आणखीच वाढ होत जाते. या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये नुकताच झालेला सुरेश पाटील आणि रत्ना पांगारे या अनाथ, दृष्टिहीन दाम्पत्याचा विवाह वेगळा ठरावा
‘एसएसबी’ पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी २१ फेब्रुवारी ते दोन मार्च २०१९ या कालावधीत ‘एसएसबी’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language